विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशामुळे आता नवे कारभारी राज्यातील प्रशासकराज असलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजवण्याच्या तयारीत आहेत. 2025 मध्ये होणाऱया नव्या जनगणनेची वाट न पाहता जुन्याच जनगणनेवर आधारित आहे ते गट, गण किंवा प्रभाग रचनेत थोडा फेरबदल करून निवडणुका घेण्याचे मनसुबे रचले जात आहेत.