झोमॅटोने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

झोमॅटोने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) प्लॅटफॉर्म नगेट लाँच झाल्यानंतर कर्मचाऱयांना काढले आहे. नगेट जवळपास 80 टक्के प्रश्न एआयद्वारे सोडवत आहे. एआयमुळे ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी लागणारा वेळ 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून टेक सेक्टरमधील कंपन्या हजारो कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकत आहेत. पंपन्यांमधील कर्मचारी कपात ही हिंदुस्थानसह जगभरात केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.