Zika Virus : महाराष्ट्रात झिका व्हायरसबाबत केंद्राचा अलर्ट, इतर राज्यांनाही सूचना

महाराष्ट्रात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले. झिका व्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहेत. राज्यांमध्ये गरोदर महिलांमध्ये झिका व्हायरसच्या तपासावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह अन्य राज्यांना देखील गर्भवती महिलांची संसर्गासाठी तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आढळणाऱ्या गर्भवती महिलांच्या गर्भाच्या विकासावर लक्ष ठेवून सतत पाळत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाकडून जारी केल्या सूचना 

–  झिका संक्रमित गरोदर महिलांनाबाबत राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, झिका बाधित गर्भवती महिलांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्यांना डॉक्टरांना सतर्क करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

– राज्यांना बाधित भागात आरोग्य सुविधा किंवा बाधित भागातून येणारे प्रकरणे हाताळणारे लोक निर्देशित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

–  झिका व्हायरस संक्रमणासाठी गर्भवती महिलांची तपासणी केली आहे.

–  झिकासाठी सकारात्मक परीक्षण करण्यासाठी गर्भवतींनी भ्रूणाच्या विकासावर नजर ठेवावी.

–  अॅडव्हायजरीमध्ये राज्यांना नागरिकांमधील भिती कमी करण्यासाठी सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर सावधगिरीच्या IEC संदेशांद्वारे जागरूकता वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डेंग्यू आणि चिकुनगुनियाप्रमाणे झिका हा एडिस डासांद्वारे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. तथापि, ‘झिका’ची लागण झालेल्या गर्भवती महिलांच्या पोटी जन्मलेल्या बाळांना डोक्याचा आकार कमी (मायक्रोसेफली) झालेला असतो, जो एक प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. हिंदुस्थानात 2016 साली पहिल्यांदा गुजरातमध्ये झिकाचे पहिले प्रकरण समोर आले होते. त्यानंतर तामिळनाडू, मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकासहित अन्य राज्यांतून या आजाराच्या संक्रमणाची प्रकरणे समोर आली.