नगर जिल्ह्यात झिका आजाराचे सापडले दोन रुग्ण

नगर जिल्ह्यामध्ये झिकाचे दोन रुग्ण नव्याने सापडले असून ते संगमनेर तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली नागरिकांनी सतर्क राहून वेळीच उपचार करून घ्यावे असे आव्हान सुद्धा केले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये चार स्वाईन फ्लूच्या सुद्धा रुग्ण आढळून आले आहे.

झिका या नव्या आजाराचे रुग्ण पुण्याबरोबर आता सर्वत्र सापडू लागले आहे. या अगोदर नगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीला याची लागण झालेली होती. तो व्यक्ती बरा झालेला आहे.

काल संगमनेर तालुक्यातील दोन गरोदर महिलांना या आजाराची लागण झाली आहे तपासामध्ये यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तात्काळ नगरच्या जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच नाशिकच्या पथकाने संगमनेर या ठिकाणी धाव घेत या ठिकाणी सर्व गरोदर महिलांचे तपासणी करून घ्यावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले होते ज्या दोन महिलांना याची लागण झाली होती त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीच बिघाड झालेली नाही तसेच पोटामध्ये असलेले गर्भाशय सुद्धा चांगल्या प्रकारचे असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असल्याचे डॉक्टर नागरगोजे यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झिकाचे तीन रुग्ण आढळून आलेले आहेत संगमनेर या परिसरामध्ये आता वेगवेगले पथक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या संदर्भातील माहिती घेऊन तात्काळ उपचार करण्याच्या संदर्भातल्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य पद्धतीने तात्काळ उपचार करून घ्यावेत असे आव्हान सुद्धा या अगोदर करण्यात आले असल्याचे डॉक्टर नागरगोजे यांनी सांगितले.

पावसाळ्यामध्ये अनेक जंतूंचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे वेगवेगळे प्रकारचे आजार हे येत असतात स्वाईन फ्लू सारख्या आजाराने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यामध्ये डोके वर काढले असून चार रुग्ण आता त्याचे सापडले आहे त्यातील तीन हे संगमनेर मधील व एक कर्जत तालुक्यातील आहे. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आरोग्य यंत्रणेने कशाप्रकारे नागरिकांनी काळजी घ्यावी या प्रकारचे आम्हांस सुद्धा केले आहे नागरिकांना जर काही आजाराची लक्षणे असेल तर त्यांनी तात्काळ दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावे असे आवाहन सुद्धा डॉक्टर नागरगोजे यांनी केले आहे