Yuzvendra Chahal- घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री गर्लची एन्ट्री, संपूर्ण सामन्यात युजवेंद्र चहल आणि मिस्ट्री गर्लची चर्चा

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा सुवर्ण इतिहास रचला. न्यूझीलंड विरुद्धच्या या अटीतटीच्या सामन्याच टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या मॅचसाठी देश विदेशातून चाहत्यांनी स्टेडीयमवर हजेरी लावली होती. मात्र यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीसोबत चर्चा होती ती म्हणजे टीम इंडियाचा जबरदस्त गोलंदाज युजवेंद्र चहलची. चहलही हा सामना पाहण्यासाठी आला होता. यादरम्यान चहलसोबत एक ‘मिस्ट्री गर्ल’ देखील दिसली. सोशल मीडियावर यादोघांबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.

अलिकडेच युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाबाबत अनेक बातम्या समोर आल्या. त्यामुळे चहल बऱ्यात दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा एकदा चहलचं नाव एका तरूणीसोबत जोडलं जात आहे. कारण चहल कालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एका मिस्ट्री गर्लसोबत स्टेडियमवर दिसला. ही मिस्ट्री गर्ल म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून फेमस आरजे माहवाश होती. हे दोघेही यापूर्वी देखील एकत्र दिसले होते. दरम्यान या दोघांचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahvash (@rj.mahvash)


दरम्यान, आरजे माहवाशने स्वत: सोशल मीडियावर कालच्या सामन्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा आणि चहलचाही फोटो तिने शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. माहशाहने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.