युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट, लग्नाच्या चार वर्षानंतर तुटलं नातं

हिंदुस्थान क्रिकेट टीमचा स्पिनर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. धनश्री आणि चहल यांनी डिसेंबर 2020 साली लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघे विभक्त झाले आहेत. मुंबईच्या वांद्रे कोर्टात धनश्री आणि चहलच्या घटस्फोटावर सुनावणी सुरू होती. आज कौटुंबिक न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे.

चहल आणि धनश्रीची पहिल्यांदा ओळख सोशल मीडियावारून झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न केलं. पण त्यांचं हे नातं फार टिकलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार चहलला धनश्रीला पोटगीच्या रुपात 4.75 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यापैकी 2.37 कोटी रुपये चहलने आधीच दिले आहेत.

युजवेंद्रला धनश्रीकडून डान्स शिकायचा होता, त्यामुळे चहलने धनश्रीशी संपर्क साधला होता. 22 डिसेंबर 2020 रोगी गुरुग्रामध्ये दोघांनी लग्न केलं होतं. पण काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडू लागले. जून 2022 पासून आपण वेगळे राहत असल्याचे दोघांनी कोर्टात सांगितले. चहल आणि धनश्री नेमके वेगळे का झाले याचे कारण समोर आलेले नाही.