
नीट परीक्षेतील गैरप्रकार व पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाविरोधात युवासेनेचा बुलंज आवाज दिल्ली दरबारी घुमला. इंडिया युथ फ्रंटच्या माध्यमातून बुधवारी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर तीव्र निदर्शने करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमताच्या आतच रोखल्यानंतर आता ‘इंडिया’ आघाडीने आपले जाळे पसरवायला सुरुवात केली आहे. सोमवारी ‘इंडिया युथ फ्रंट’या छत्राखाली ‘इंडिया’ आघाडीच्या देशभरातील युवा संघटनांचे पदाधिकारी जंतरमंतर येथे नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात निदर्शने करण्यासाठी एकत्र आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रणीत युवासेना, काँग्रेसची इंडियन युथ काँग्रेस, आम आदमी पार्टीची ‘छात्र युवा संघर्ष समिती’, सीपीआयची ऑल इंडिया युथ फेडरेशन, आय.यू.एम.एलची ‘मुस्लिम युथ लीग’, समाजवादी पार्टीची ‘समाजवादी युवजन सभा’, आर.जे.डी.ची युथ ‘आर.जे.डी’, पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीची युथ विंग आणि डेमोव्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी निदर्शनांमध्ये भाग घेतला.
या निदर्शनादरम्यान शिवसेना उपनेत्या व युवासेना कार्यकारिणी सदस्य शीतल शेठ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी सहभाग घेतला होता.