आफ्रिकन देश युगांडामध्ये ‘डिंगा डिंगा’ विषाणूने कहर केला असून आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. लागण झालेल्यांमध्ये महिला आणि मुली मोठ्या प्रमाणात आहेत. युगांडातील बुंदीबाग्यो जिल्ह्यात हा विषाणू आढळला आहे. ज्याला या विषाणूची लागण झाली त्या व्यक्तीच्या शरीरात तीव्र थरकाप सुरू होतो. हा थरकाप इतका तीव्र असतो की रुग्ण नाचत असल्यासारखे दिसते.
संसर्ग गंभीर असल्यास, रुग्णाला अर्धांगवायूचा झटकादेखील येऊ शकतो. हा विषाणू पहिल्यांदा 2023 मध्ये आढळला होता. तेव्हापासून युगांडा सरकार याची पडताळणी करत आहे. युगांडाच्या आरोग्य विभागाने अद्याप डिंगा विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. विभागाने लोकांना वेळेवर औषधे घेण्याचा सल्ला दिला आहे.