
वादगस्त विधान केल्याप्रकरणी यूटय़ूबर रणवीर अलाहाबादीया आणि समय रैनाला महाराष्ट्र सायबरने समन्स केले होते. आज रणवीर आणि समय हे दोघे चौकशीसाठी कफ परेड येथील कार्यालयात हजर झाले. त्या दोघांचा पोलिसांनी जबाब नोंदवला. छोटय़ा पडद्यावरील इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात यूटय़ूबर रणवीर अलाहाबादीयाने वादगस्त विधान केले होते. रणवीरने एका स्पर्धकाशी संभाषण करताना ते आक्षेपार्ह विधान केले होते. रणवीरच्या त्या कृत्याचे पडसाद सर्वत्र उमटले होते. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी देखील गुन्हा नोंद केला होता. सायबर पोलिसांनी रणवीरसह 40 जणांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स केले होते. महाराष्ट्र सायबर विभागाने यूटय़ूबर रणवीरला चौकशीसाठी समन्स केले होते. मात्र रणवीर हा जबाब नोंदवण्यासाठी येत नव्हता. गेल्याच आठवडय़ात पोलिसांनी रणवीर आणि समयला चौकशीसाठी समन्स केले होते. समन्स केल्यानंतर आज रणवीर आणि समय हे दोघे कफ परेड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले.