अपूर्वा मखिजाने मुंबईतील घर सोडले

‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादापासून चर्चेत आलेली यूट्यूबर अपूर्वा मखिजा हिने तिचे मुंबईतील घर सोडले. अपूर्वाने नुकताच एक ब्लॉग शेअर केला आणि समय रैनाच्या शोची संपूर्ण कहाणी सांगितली. अपूर्वा मखिजाने इन्स्टाग्रामवरून तिचे मागील सर्व कंटेंट डिलीट केले. त्यानंतर तिने एक फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये ती तिच्या मुंबईतील अपार्टमेंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिने एका घराचा फोटो शेअर केला. तिने फोटोला कॅप्शन दिले, ‘एका युगाचा अंत.’