प्रसिद्ध युट्यूबरला 40 तासांची डिजिटल अरेस्ट

यूटय़ूबर अंकुश बहुगुणाला 40 तास डिजिटल अरेस्ट झाली. अंकुश बहुगुणा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याची माहिती दिली. ‘या घटनेतून मी अद्याप सावरलेलो नाही. मी पैसे गमावले. मनःशांतीही गमावली. विश्वासच बसत नाही की असे काही झालंय. इतरांसोबत असे होऊ नये म्हणून हा व्हिडिओ पोस्ट करत आहे, असे  बहुगुणाने सांगितले.

तो पुढे म्हणाला की, मला कुरिअरच्या डिलिव्हरीसंदर्भात कॉल आला होता. त्यांनी माझ्यावर मनी लॉण्डरिंग, ड्रग्ज टॅफेकिंग गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. त्यानंतर मला 40 तास डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले. या दरम्यान कुणाशीही बोलण्यास, कॉल घेण्यास मनाई करण्यात आली. एवढेच नव्हे तर, स्कॅमरने त्याला बँकेत जाऊन रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले.

कुरिअरमध्ये काही बेकायदेशीर वस्तू सापडल्याचे मला सांगण्यात आले. माझ्या नावाने अरेस्ट वॉरंट निघाल्याचे सांगण्यात आले. व्हिडियो कॉलमध्ये स्कॅमर्स पोलिसांच्या वेशभूषेत दिसत होते.