YouTube ची मोठी कारवाई, 95 लाखांहून अधिक व्हिडीओ केले डिलीट; काय आहे कारण?

YouTube ने मोठी कारवाई करत 95 लाखांहून अधिक व्हिडीओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले आहेत. कंटेंट पॉलिसीच्या उल्लंघनामुळे युट्यूबने हे व्हिडीओ डिलीट केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे व्हिडीओ गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान युट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. YouTube वरून हटवलेल्या व्हिडिओंपैकी बहुतेक व्हिडीओ हे हिंदुस्थानी कॉन्टेन्ट क्रिएटर्सचे होते.

YouTube ने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, हे व्हिडीओ त्यांच्या कॉन्टेन्ट पॉलिसीच्या विरुद्ध आहेत. यात हिंदुस्थानी कॉन्टेन्ट क्रिएटर्सने अपलोड केलेले सर्वाधिक 30 लाख व्हिडीओ युट्यूबने डिलीट केले आहेत. युट्यूबने डिलीट केलेल्या बहुतेक व्हिडीओंमध्ये हेट स्पीच, अफवा, छळवणुकीचे व्हिडीओ होते, जे कंपनीच्या कंटेंट पॉलिसीच्या विरुद्ध होते.