वीजेचा शॉक लागल्याने मालाडमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कमलेश चंद्रकांत शिताब असे मयत तरुणाचे नाव आहे. मालाडमधील त्रिवेणीनगरमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली.
वीजेचा शॉक लागल्यानंतर कमलेश रस्त्याच्या कडेला असलेल्या 25 फूट खोल आणि 19 फूट रुंद नाल्यात पडला. तरुणाला पडताना पाहून आजूबाजूचे नागरिक धावत आले. नागरिकांनी तरुणाला तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.