
पुण्यात युवा काँग्रेसकडून महायुती सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. ‘नोकरी दो, नशा नही’, अशी घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली. या आंदोलनात युवक काँग्रेस अध्यक्ष उदय भानू चिब उपस्थित होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण सहभागी झाले होते.
हे आंदोलन सुरू असतानाच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावेळी आंदोलक कार्यकर्ते म्हणाले की, पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे. या सरकारच्या कार्यकाळात तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. बेरोजगारी वाढली आहे. आम्ही शांततेत आंदोलन करत असतानाही आमचा आवाज सरकारकडून दाबला जात आहे.