
उन्हाळा सुरु झाल्यानंतर आपला चेहरा खूप मोठ्या प्रमाणात टॅन होतो. परंतु या उन्हामुळे आपले हात पायही खूप टॅन होतात. म्हणूनच हातावरील टॅनिंग घालवण्यासाठी काही फळांची सालं आणि घरगुती उपाय हे खूप उपयुक्त ठरतात. उन्हाळ्यात स्लिव्हलेस ड्रेस किंवा अर्ध्या बाह्यांचे ड्रेस घातल्यावर, टॅनिंग असलेले हात खरोखर वाईट दिसतात. अशावेळी हातांचे टॅनिंग घालवण्यासाठी काही सोपे उपाय आपण घरच्या घरी करु शकतो. घरच्या घरी हाताचे टॅनिंग घालवण्यासाठी, आपल्याला जास्त खर्चही येणार नाही. त्यामुळे आता तुमच्याही हातांना टॅनिंग असेल तर हे साधेसोपे उपाय तुम्ही घरी नक्की करुन बघा.
तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी
साहित्य- 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा गुलाबजल
तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी एकत्र करा. आता हे मिश्रण हातांच्या त्वचेवर लावा. 10 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की मिश्रण सुकले आहे. नंतर साध्या पाण्याने हात धुवा. लक्षात ठेवा की हा घरगुती हॅण्ड पॅक हातात लावल्यावर हातांची हालचाल करु नका.
पुदिन्याच्या पानामुळे चेहऱ्यावरील मुरुमे होतील चुटकीसरशी गायब; वाचा पुदिना टोनरचे खूप सारे उपयोग
पपई आणि मध
साहित्य- १ टीस्पून पपईची पेस्ट, १/२ टीस्पून मध
पपईची पेस्ट आणि मध मिसळून घ्या. हे मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर हे मिश्रण हातावर लावा. 15 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर आपले हात धुवा.
फायदे- पपईमध्ये बीटा कॅरोटीन असते, जे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करते. तर मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)