अवघ्या 25 दिवसात अमेरिकेतून माघारी

अमेरिकेने घुसखोर हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी पाठवले आहे. यात एका तरुणीचा समावेश असून ती अवघ्या 25 दिवसापूर्वी अमेरिकेत गेली होती. परंतु, तिला आता गुजरातला परत यावे लागले आहे. खशबू पटेल असे या तरुणीचे नाव आहे. ती पादरा तालुक्यातील लूना गावची रहिवासी आहे. तिचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. नवऱ्याला भेटायला ती 25 दिवसांपूर्वी अमेरिकेला गेली होती.

अमेरिकेत नोकरी असलेला नवरा आहे. यामुळे तिने लग्न केले होते. अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न तिने पाहिले होते. परंतु, तिच्या स्वप्नावर आता पाणी फिरले गेले आहे. अमेरिकेहून परतलेल्यापैंकी गुजरातमधील 33 जणांना वडोदरा विमानतळावर सोडण्यात आले. त्या पहिल्या खेपेत खुशबू पटेलही होती. तिला अहमदाबाद विमानतळावर सोडण्यात आले. 33 गुजराती मेहसाणा, पाटण, गांधीनगर, आनंद, भरूच आणि बनासकांठा जिल्ह्यातील लोक आहेत.