
युवतीने शौचालयात जाऊन धारदार शस्त्राने स्वतःवर इजा करून घेतल्याची घटना आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात घडली. जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत. तिने कशासाठी स्वतःवर हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जखमी युवती ही ठाणे जिह्यात राहते. ती खासगी महाविद्यालयात शिकते. आज दुपारी ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आली. जनरल हॉलमधील ती महिलांच्या प्रसाधनगृहात गेली.
प्रसाधनगृहात जाऊन तिने धारदार शस्त्राने स्वतःवर हल्ला केला. हा प्रकार तेथे काम करणाऱ्या सफाई कामगार महिलेच्या लक्षात आला. तिने याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना दिली. त्यानंतर काहीच वेळात रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस घटनास्थळी आले. जखमी युवतीला सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.