
कल्याण आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक दरम्यान चेन्नई एक्सप्रेसवर अज्ञातांकडून झालेल्या दगडफेकीत कर्जत येथील प्रवासी तरुणी जखमी झाली आहे. तिला कर्जत रेल्वे स्थानकात उतरवून तत्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणीच्या डोक्याला दगडाचा मार लागल्याने ती जखमी झाली. ही घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. ही मुलगी ठाण्याहून ऑफिसमधून घरी परतताना ही घटना घडली. जखमी तरुणीचे नाव तेजस्विनी भोईर (24) असून ती कर्जत खांडपे येथील राहणारी आहे. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान चेन्नई एक्सप्रेसवर झालेल्या दगडफेक प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.