
लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. हा क्षण आयुष्यभर आठवणीत राहवा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे लोक धूम धडाक्यात लग्न करतात. काही प्रेमविवाह असतात, तर काही घरच्यांनी जुळवलेल्या रेशीम गाठी असतात. पण कधी, कुणी प्रेयसी आणि कुटुंबाची मर्जा राखण्याकरता दोन लग्न केल्याचे तुम्ही पाहिलंय का? पण असे घडले आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही लग्न एकाच दिवशी झाली.
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील हरपूर येथे राहणाऱ्या तरुणाने सकाळी लव्हमॅरेज तर सायंकाळी अरेंजमॅरेज केले. मात्र कायद्यानुसार तुम्हाला एकच लग्न करण्याची परवानगी आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून सदर व्यक्ती फरार झाला आहे. ‘इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.
गोरखपूरच्या हरपूर बुदहट भागातील एका तरुणाचे एका तरुणीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र या नात्याला त्यांच्या कुटुंबातून विरोध होता. आपण ठरलेल्या मुलीशीच मुलाने लग्न करावे असा आग्रह कुटुंबियांचा होता.
दरम्यान, प्रेमसंबंधातून प्रेयसी गर्भवती राहिली. त्यामुळे तिचा दोन वेळा गर्भपातही करण्यात आला. त्यानंतरही ती पुन्हा गर्भवती राहिल्याने प्रसूतीसाठी तिला एका वृद्धाश्रमात पाठवण्यात आले आणि तिथे तिने एका बाळाला जन्म दिला. याच काळात प्रेमीयुगुलाने मंदिरात लग्नही केले. पण कोर्ट मॅरेज केले नाही तर घरचे स्वीकार नाहीत असे वाटल्याने दोघांनीही एक तारीख निश्चित केली आणि कोर्टात जाऊन लग्न केले.
लग्नानंतर दोन आठवड्यातच पतीची सुपारी देऊन काढला काटा, पत्नी आणि प्रियकराला अटक
दुसरीकडे त्याच दिवशी सायंकाळी घरच्यांनी तरुणाचे लग्न एका तरुणीशी ठरवले होते आणि तरुणानेही कोणतेही आढेवेढे न घेता तिच्याशाही लग्न उरकून घेतले. ही बाब जेव्हा प्रेयसीला कळाली तेव्हा ती त्याच्या घरी गेली. मात्र तिथे आपल्याला अपमानित करण्यात आले, असा दावा तरुणीने केला. यानंतर तिने पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. तरुणीने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्याचे पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. सध्या दोन लग्न करणारा तरुण फरार असून त्याचा शोध सुरू आहे.