देवणी तालूक्यातील टाकळी( वलांडी ) येथे अनाधिकृतपणे वृक्ष तोडीचे काम सुरु होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली. झाड तोडत असताना ते शेजारील विजेच्या पोलवर पडले. त्यामुळे पोलजवळ उभ्या असलेल्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान मृत मुलाच्या नातेवाईकांनी निष्काळजीपणे व विनापरवाना वृक्ष तोड करणाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्या शिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्ताफ हमजा नाईकवाडे (२०) असे त्या तरूणाचे नाव आहे. डोक्यावर विद्युत पोल पडल्याने अल्ताफ जबर जखमी झाला. यावेळी गावक-यांनी तात्काळ उपजिल्हा रूग्णालय ऊदगीर येथे ऊपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान अल्ताफ नाईकवाडे याचा मृत्यू झाला.
अल्ताफच्या अशा अपघाती निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी निष्काळजीपणे व विनापरवाना वृक्ष तोडणा-या वर मनूष्य वधाचा गुन्हा दाखल केल्या शिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला आहे .मृतदेह हा ऊदगीर येथील उपजिल्हा रूग्णालयात आहे .