नेवासात नदीवरील पुलावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या

sunk_drawn

नेवासा शहरातील गंगानगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास प्रवरा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. शहरातील गंगानगर भागात राहणाऱ्या संतोष नामदेव कंदरे (वय 29) या तरुणाने नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना समजतात गावातील तरुणांनी नदीपात्रात उतरत शोध मोहीम सुरू केली होती. मात्र, नदीपात्रात कमी पाणी असल्याने नदीत उडी घेतलेला तरुण गाळात रुतून बसला होता. त्यामुळे सुमारे अडीच तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तरुणाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.