
गेल्या लोकसभेत मला बोलू दिले नाही, माझे निलंबन केले गेले, पण एका खासदाराचा आवाज दाबण्याच्या नादात तुम्ही मोठी किंमत मोजलीत. 63 खासदार गमावलेत, अशी सणसणीत चपराक तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सत्ताधारी भाजपला लोकसभेत लगावली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना त्या म्हणाल्या की, गेल्या अधिवेशनात विरोधकांनी जशी वागणूक दिली गेली तशी वागणूक देणे आता भाजपला परवडणार नाही.
मला गप्प करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात, जनतेनेच त्यांना गप्प केले, ज्यामुळे त्यांनी त्यांचे 63 खासदार गमावले. मुझको बिठाने के चक्कर में जनता ने आपको बिठा दिया, आपके 63 खासदार नुकसान कर दिया, अशी आक्रमक सुरुवात मोईत्रा यांनी चर्चेत सहभागी झाल्यावर केली. संसदेत सेंगोलच्या स्थापनेचाही त्यांनी निषेध केला आणि त्याला लोकशाहीत स्थान नसलेल्या राजेशाहीचे प्रतीक म्हटले.