ॲपलचं नवीन iOS 18.3 अपडेट अखेर आलं आहे. नियमित फीचर्स व्यतिरिक्त कंपनीने यावेळी फोनमध्ये Starlink कनेक्टिव्हिटी देखील जोडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने 2022 मध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर सादर केले होते, मात्र आता iOS 18.3 सह त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, Apple iPhone वर Starlink सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी SpaceX आणि T-Mobile सोबत काम करत आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, टी-मोबाइलने सध्या काही आयफोनसह स्टारलिंक सेवा सुरू केली आहे. असं असलं तरी ॲपलने अपडेटच्या रिलीज नोट्समध्ये याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
असं बोललं जात आहे की, नवीन अपडेटसह सेल्युलर नेटवर्क नसतानाही युजर्स मेसेज पाठवू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, जेव्हा T-Mobile च्या iPhone मध्ये सेल्युलर सिग्नल नसेल, तेव्हा Starlink प्रोग्राममधील फोन SpaceX सॅटेलाइटशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतील. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये या फीचरमधील बदलला हायलाइट करण्यात आलं आहे. ॲपलचे हे फीचर वापरण्यासाठी युजर्सला सॅटेलाइट कनेक्ट करण्यासाठी त्यांचा आयफोन आकाशाकडे सेट करणे आवश्यक आहे. मात्र स्टारलिंक पर्यायासह फोन युजरच्या खिशात असला तरीही ते ऑटोमॅटिक काम करू शकतो.