![whatsapp](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/whatsapp-696x447.jpg)
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्त्वाचे अपडेट आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच नवे फीचर जोडले जाणार आहे. या फीचरमुळे युजर्सला पाणी, वीज, गॅस आदी बिले भरता येणार आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये व्हॉट्सअॅपने देशात यूपीआयने पैसे पाठवण्याचा आणि प्राप्त करण्याचा पर्याय सुरू केला होता. अलीकडे एनपीसीआयने मेटा मालकीच्या प्लॅटफॉर्मसाठी यूपीआय ऑनबार्ंडग मर्यादा हटवली. ही मर्यादा 10 कोटी युजर्सपर्यंत होती. मात्र ती आता हटवण्यात आली. त्यामुळे सर्व युजर्ससाठी आपल्या पेमेंट्सचा विस्तार करण्याची परवानगी मिळाली आहे. डिजिटल पेमेंटमध्ये व्हॉट्सअॅपला तगडी स्पर्धा असेल.