
उत्तर प्रदेशात मुसलमान सर्वात सुरक्षित असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. येथे सर्व धर्माचो लोक सुरक्षित आहेत. राज्यात हिंदू सुरक्षित असले तर मुसलमानही सुरक्षित आहे. अनेक हिंदू कुटुंब राहत असलेल्या भागात एखादे मुस्लीम कुटुंब वास्तव्यास असेल तर ते कुटुंब स्वतःला सुरक्षित समजते. परंतु, 100 मुस्लीम कुटुंब असलेल्या भागात 50 हिंदूंची घरे असतील तर ते सुरक्षित असतात का, असा सवालही त्यांनी केला आहे. ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुस्लिमांना शेवई, खजूर आणि डायफ्रूट वाटले जात आहेत. त्यानंतर आता योगींनी मुसलमानांच्या सुरक्षिततेबद्दल भाष्य केले आहे.
100 मुस्लीम कुटुंब वास्तव्यास असलेल्या परिसरात 50 हिंदू सुरक्षित नसतात. बांगलादेश हे त्याचे उदाहरण आहे. पूर्वी पाकिस्तान त्याचे उदाहरण होता. परंतु, तिथे काय झाले ते सर्वांना माहिती आहे. पाकिस्तानात काय झाले? अफगाणिस्तानात काय झाले? याची आपल्याला कल्पना आहे. जर कुठे धूर दिसत असेल तर आपण सावध झाले पाहिजे. कुणाला इजा झाली असेल तर इतरांनी सावधगिरी बाळगायला हवी. आम्ही राज्यकर्ते म्हणून राज्यातील प्रत्येकाशी सारखाच व्यवहार करतो असेही योगींनी म्हटले आहे. राज्यात आमची सत्ता आल्यापासून जातीय दंगली होणे बंद झाले. 2017 च्या आधी उत्तर प्रदेशात दंगली झाल्या, असेही योगींनी म्हटले आहे.