येस बँकेला 2209 कोटींची इन्कम टॅक्सची नोटीस

येस बँकेला तब्बल 2209 कोटी रुपयांची नोटीस आयकर विभागाने पाठवली आहे. बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे, परंतु ही नोटीस चुकीची आहे, असे येस बँकेचे म्हणणे आहे. आयकर विभागाने कलम 156 अंतर्गत व्याजासह 2,209.17 कोटी रुपयांची मागणी केली आहे. आयकर विभागाच्या नोटिसीविरोधात येस बँक पुनर्मूल्यांकन आदेशाविरोधात अपील करेल, असे येस बँकेने म्हटले आहे. या नोटिसीचा आर्थिक कामकाजासह बँकेच्या अन्य कामकाजांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे.