धक्कादायक! शेतीच्या वादातून तिघांची हत्या, दोन गंभीर

राज्यात सध्या गुन्ह्यांचे सत्र वाढल्याचे पाहायला मिळत असून येरमाळ्यातील बावी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री येथील पारधी समाजातील दोन गटात शेतीच्या वादातून जबरदस्त हाणामारी झाली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे ही आप्पा काळे, सुनील काळे आणि वैजनाथ काळे अशी आहेत. तर जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार, शेतीच्या वादातून हाणामारी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. चौकशीसाठी पोलिसांनी दोन्ही गटातील दहा जणांना ताब्यात घेतल्याचंही कळतं आहे.