भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर अडचणीत येण्याची शक्यता आहे. वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह खेडकरला मदत करणाऱया प्रत्येकाची सखोल चौकशी करावी. खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट असल्यास ते उघडकीस आणण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. खेडकर यांना वायसीएम रुग्णालयातून 2022मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या डाव्या गुडघ्याला सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचे संबंधित प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. आता हे प्रमाणपत्र देतानाही नियमांचे पालन झाले नसल्याचे आरोप होत आहेत. याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजाने पेंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे सांगितले जाते.