
यवतमाळच्या जंगलात वेदनेने विव्हळत असलेल्या, पण मागील दोन्ही पाय उचलू न शकता येणाऱया वाघिणीला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज होती. त्यासाठी तिला रात्री उशिरा बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. वाघिणीला अर्धांगवायू झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी वर्तवला. यवतमाळ जिह्यातील मुपुटबन वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियतक्षेत्र कक्ष क्र. 20 (ब) सावळी रोपवनामध्ये वाघिणीच्या मागच्या पायाला दुखापत झाली होती. वाघीण फारच अशक्त झाली होती. तिला उपचारासाठी गोरेवाडय़ात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. गोरेवाडा बचाव पेंद्रात शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.