यवतमाळमध्ये शाळेच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. स्टिअरिंगचा रॉड तुटल्याने बस अनियंत्रित झाली आणि झाडावर आदळली. मयत विद्यार्थिनी इयत्त नववीत शिकत होती. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी उमरखेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूलची बस शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत चालली होती. यावेळी दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान स्कूलबसचा स्टिअरिंग रॉड तुटला. यामुळे बस अनियंत्रित होऊन अपघात झाला. यात महिमा आप्पाराव सरकटे या नववीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.