जगभरात ’एक्स’ची सेवा विस्कळीत

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ’एक्स’ची सेवा सोमवारी दुपारी विस्कळीत झाली. जगभरातील हजारो यूजर्संना एक्स वापरताना समस्या येत असल्याचे त्यांनी सांगत अन्य सोशल मीडियावर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. डाऊन डिटेक्टर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, एक्सवर दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अडचणी यायला सुरुवात झाली.