जर मुंबईत कुठेही दिसलास तर तुला सोडणार नाही; WWE च्या कुस्तीपटूने रणवीरला दिली धमकी

प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रणवीरने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणी केल्यामुळे तो अडणीत आलाय. यानंतर त्याच्याविरोधात एकामागून एक एफआयआर दाखल होत आहेत. यादरम्यान अनेक कलाकारांनी त्याच्या या वक्तव्यावर नाराजी दर्शवली होती. अशातच आता WWE च्या एका कुस्तीपटूने त्याला थेट धमकी वजा इशाराच दिली आहे.

प्रसिद्ध WWE कुस्तीपटू सौरव गुर्जरने त्याच्या एक्स अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामधून त्याने यूटूबर रणवीर अलाहाबादिया फटकारले आहे. रणवीर अलाहाबादिया माफीलाही पात्र नसल्याचे त्याने सांगितले आहे. जर आपण आज यावर कारवाई केली नाही, तर उद्या दुसरा, तिसरा, चौथा व्यक्ती अशा घाणेरड्या कमेंट करत राहील. जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला आणि धर्माला वाचवायचे असेल तर अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. जेणेकरून कोणीही पुन्हा असे करण्याचा विचार देखील करणार नाही. त्यामुळे ‘मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती करतो, असे तो यावेळी म्हणाला.

माझ्यापासून कोणीच याला वाचवू शकणार नाही

सौरवने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून रणवीरला मारण्याची धमकी देखील दिली आहे. मला समजत नाही की इतका निर्लज्ज माणूस त्याच्या पालकांच्या डोळ्यात तरी कसा पाहू शकतो. मला इतका राग येतोय की जर मी या व्यक्तीला मुंबईत कुठेही, कोणत्याही पार्टीत, कोणत्याही कार्यक्रमात भेटलो तर त्याची सुरक्षा किंवा जगातील कोणतीही शक्ती त्याला वाचवू शकणार नाही. बेशरम माणसा, थोडी तरी लाज बाळग. त्याने माफी मागतो किंवा काहीही करतो तरी आपल्याला कारवाई करावीच लागेल, अशी मागणी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

India’s Got Latent Row : रणवीर अलाहाबादीया नॉट रिचेबल; घराला कुलूप, फोनही बंद