WWE चा स्टार रे मिस्टोरियो सीनियर काळाच्या पडद्याआड, 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

क्रिडा क्षेत्रातून एक दुख: बातमी मिळत आहे. सुप्रसिद्ध कुस्तीपटू रे मिस्टोरियो सिनियर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रे मिस्टोरियो सिनियर यांचे निधन झाल्याची बातमी त्यांचा मुलगा आरोन लोपेझ यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करत दिली आहे.

रे मिस्टोरियो हे WWE गाजवाणारे एक प्रसिद्ध कुस्तीपटू होते. त्यांनी 1976 मध्ये प्रोफेशनल कुस्ती खेळायला सुरुवात केली. 2023 मध्ये ते आपल्या प्रोफेशनल कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. इतक्या वर्षाच्या कारकीर्दीत मिस्टोरियो यांनी WWA वर्ल्ड ज्युनियर लाईट व्हेट चॅम्पिनयशिपचा खिताब पटकावला होता.