Sugar Daddy! घटस्फोटावर शिक्कामोर्तब होत असताना चहलनं घातलेला टी-शर्ट चर्चेत, धनश्रीवर निशाणा?

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रसिद्ध क्रिकेटरच्या घटस्फोटाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. मुंबईच्या वांद्रे कोर्टात धनश्री आणि चहलच्या घटस्फोटावर सुनावणी सुरू होती. गुरूवारी कौटुंबिक न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होती. मात्र अखेरच्या दिवशी सर्वांचे लक्ष वेधलं ते युजवेंद्र चहलच्या टीशर्टने. युजवेंद्र चहल आणि त्याची धनश्री वर्मा अखेरच्या सुनावणीसाठी कौटुंबिक न्यायालयालयात दाखल झाले. तेव्हा दोघांनीही चेहऱ्यावर मास्क लावले होते. यावेळी चहलने एक युनिक टीशर्ट परिधान केले होते. त्य़ा टीशर्टवरील मेसेजने संपूर्ण हिंदुस्थानचे लक्ष वेधले.

चहलने काळ्या रंगाचे टीशर्ट परिधान केले होते. यावर “Be your own sugar daddy” असे लिहिले होते. नेटकऱ्यांच्या मते, हा स्पेशल मेसेज धनश्री वर्मासाठी असावा. सध्या या आऊटफिटमधील चहलचा लूक प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चहलच्या टीशर्टची तुफान चर्चा आहे. चहलचे चाहते त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. तर धनश्री वर्मावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

धनश्री आणि चहल यांनी डिसेंबर 2020 साली लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघे विभक्त झाले आहेत. जून 2022 पासून आपण वेगळे राहत असल्याचे दोघांनी कोर्टात सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार चहलला धनश्रीला पोटगीच्या रुपात 4.75 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यापैकी 2.37 कोटी रुपये चहलने आधीच दिले आहेत.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट, लग्नाच्या चार वर्षानंतर तुटलं नातं