रत्नागिरी जिल्हा मल्टीपल स्पोर्टस असोसिएशन यांच्यावतीने 10 व 11 जानेवारी रोजी रत्नागिरीत कुस्तीची महादंगल आयोजित केली आहे. यामध्ये महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख, माऊली जमदाडे, शिवराज राक्षे, बाला रफीक शेख यांच्यासारखे दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार असल्याची माहिती आज आयोजक सलीम पेटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्यमनगर येथील एम.डी.नाईक सभागृहाच्या मैदानावर ही महादंगल होणार आहे.रत्नागिरीकरांना पहिल्यांदाच अशा नामवंत कुस्तीपटूंच्या लढती पहायला मिळणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर कुस्तीच्या लढती सुरू होणार आहेत. महादंगल मध्ये निमंत्रित कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये सिकंदर शेख आणि भोला सिंग यांची महत्वपूर्ण लढत असल्याचे पेटकर यांनी सांगितले. महिलांच्या आणि लहान मुलांच्या यावेळी कुस्तीच्या लढती होणार आहेत. सुमारे दोनशे कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. यावेळी शकील मोडक,इम्तियाज काझी,व्हि.एच.जोशी उपस्थित होते.