भारतमातेच्या प्रतिमेचे, राज्यघटनेच्या प्रतीचे पूजन; शिवसेना छत्रपती संभाजीनगर शाखेचा उपक्रम

शिवसेनेच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला आज शनिवारी शहरातील क्रांतीचौक परिसरातील झाशीची राणी पुतळ्यासमोर भारतमातेच्या प्रतिमेचे व भारतीय राज्यघटनेच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. शिवसेना छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतमातेच्या प्रतिमेचे आणि भारतीय राज्यघटनेच्या प्रतीचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘हुकूमशाही.. नहीं चलेंगी..’, ‘आमचं संविधान, आमचा आवाज’ अशा घोषणा देत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. तद्नंतर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर सुदाम मामा सोनवणे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, विजय वाघमारे, अरविंद धीवर, संतोष खंडके, श्रीरंग आमटे पाटील, मोहन मेघावाले, शहरप्रमुख हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, गोपाल कुलकर्णी, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, उपशहरप्रमुख अनिल लहाने, अजय चोपडे, नितीन पवार, प्रमोद ठेंगडे, सागर बारवाल, बाळासाहेब कारले, लक्ष्मण लांडे पाटील, राहुल सोनवणे, विशाल राऊत, नंदू लबडे, संतोष बारसे, प्रल्हाद घुगे, गणेश महाजन, निवृत्ती पळसकर, संजीवन सरोदे, विनोद सोनवणे, विष्णू कापसे, मनोज चव्हाण, कल्याण चक्रनारायण, रवि कोमारे, बालाजी जाधव, प्रभाकर पवार, मिलिंद जाधव, दिनेशराजे भोसले, सलीम खामगावकर, विजय जैस्वाल, सुधीर घाडगे, संदीप सपकाळ, सुनील गोडबोले, शिवाजी आपरे, उत्तम बलांडे, शाहुराज चित्ते, अजय थोरे, प्रशांत वाघमारे, अजय यार, रोहन अचलीया, युवासेना सहसचिव अॅड. धर्मराज दानवे, राजतिलक मेघावाले, कुणाल पाठक, महिला आघाडी सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा संघटक आशा दातार, महानगरप्रमुख सुकन्या भोसले, शहर संघटक सुनीता सोनवणे, वैशाली आरट, सुनीता औताडे, भागूआक्का शिरसाठ, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, सुनंदा खरात, नलेनी महाजन, नलिनी बाहेती, माजी नगरसेविका सीमा चक्रनारायण, रजनी जोशी, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, विधानसभा समन्वयक रेणुका जोशी, उपशहर संघटक संगीता पवार, कविता रेणवाले, मीना थोरवे, प्रतिभा राजपूत, रंजना कोलते, सुचिता अंबेकर, विजया पवार, बबिताराणी रणयेवले, छाया देवराज, मनीषा बिराजदार, मंगला साळवी, रोहिणी काळे, रूपाली मुंदडा, जिजाबाई घोडके, मीना यादव, दीपाली पाटील व प्राप्ती वैष्णव उपस्थित होते