मुंबईतील प्रभादेवी वरळी दरम्यान असलेल्या सेंच्युरी म्हाडा कॉलनीमध्ये राहत असलेल्या एका तरुणाने त्याच्या वडिलांच्या सर्व्हिस पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. हर्ष म्हस्के (20) असे त्या तरुणाचे नाव असून त्याचे वडील संतोष म्हस्के हे पोलिसांच्या स्पेशल युनिटमध्ये आहेत.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हर्षने त्याचे वडील घरी असताना त्यांचे सर्व्हिस पिस्तूल घेतले. त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे.