लक्षवेधी – एका फ्लॅटसाठी दोन कोटींची स्टँप ड्युटी

मुंबईतील वरळी भागात एका लक्झरी फ्लॅटची खरेदी-विक्री झाली असून यासाठी तब्बल 106 कोटी रुपये मोजले आहेत. या फ्लॅटच्या स्टॅम्प ड्युटीसाठी 1.97 कोटी म्हणजेच जवळपास दोन कोटी रुपये मोजल्याचे समोर आले आहे.

पाळीव प्राण्यासाठी नोंदणी आवश्यक

उत्तर प्रदेशातील आग्रा नगरपालिकेने कुत्रा, मांजर, ससा या पाळीव प्राण्यांसाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. नोंदणी करणाऱ्या प्राण्यांना आयडी कार्ड वितरीत केले जात आहे. आग्य्रात जवळपास 20 हजारांहून अधिक पाळीव प्राणी आहेत.

अमेरिकेला मिळाला नवीन राष्ट्रीय पक्षी

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संसदेने पाठवलेल्या विधेयकावर स्वाक्षरी केली असून ज्यामध्ये युनायटेड स्टेट्स कोडमध्ये बदल करून बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून नाव देण्यात आले आहे.