
वरळीत रविवारी सकाळी मिंधे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली. अपघात झाला तेव्हा शहा यांचा या धडकेत कावेरी नाखवा या वरळीतील महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताआधी मिहीर शहा याने मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मिहीर याने शनिवारी रात्री वाईस ग्लोबल बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास त्या बारमधून बाहेर पडल्याचे वाईस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी एबीपी माझाला सांगितले.
प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे वरळी कोळीवाड्यातील दाम्पत्य मच्छी आणायला ससून डॉकला गेले होते. तिथून परत येत असताना मिहीर शहा याच्या गाडीने त्यांच्या बाईकला धडक दिली. अपघातानंतर नाखवा दाम्पत्य कारच्या बोनेटवर पडले. प्रदीप यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी मारली, मात्र कावेरी यांना ती संधी मिळाली नाही आणि त्याच वेळी मिहीरने वेगाने कार दामटवत त्यांना चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले.