
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील हाजी अली वरळी येथील बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका आता गुरुवारपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. ही लेन पुढे खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडली जाणार आहे. यामुळे सी लिंकवर प्रवास सुरू करण्याआधी 200 मीटर आधी वाहतूक कोंडी फुटणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पावर पालिकेची यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. या प्रकल्पातील उत्तर वाहिनी मार्गावर हाजी अलीपासून ते खान अब्दुल गफार खान मार्गे राजीव गांधी सागरी सेतू दरम्यानची सुमारे साडेतीन किलोमीटर उत्तर अंतराच्या मार्गिकेची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी आज पाहणी करून आढावा घेतला.