
जगातील सर्वात मोठे रॉकेट स्टारशिप पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. 400 फूट उंच असलेल्या या रॉकेटच्या आतापर्यंत विविध चाचण्या झाली आहेत. सुरुवातीला या रॉकेटच्या उड्डाणासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र चोथा चाचणीत थोडेफार यश आले. एलन मस्क यांच्या स्पेसएक्स या पंपनीला या रॉकेट कडून खूपच आशा आहेत. भविष्यात हे रॉकेट अंतराळवीरांना चंद्र आणि मंगळावर घेवून जावू शकतात.
स्टारशिपचे पाचवे परीक्षण लवकरच होणार आहे, अशी एक्सवरून नुकतीच उड्डाणाची घोषणा केली असून चार आठवडय़ानंतर स्टारशिपचे उड्डाण होणार आहे, असे स्पेसएक्सचे संस्थापक आणि सीईओ एलन मस्क यांनी सांगितले.