जगभरातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी ब्लूमबर्गने जाहीर केली आहे. ब्लूमबर्गच्या यादीनुसार, रिटेल पंपनी वॉलमार्ट चालवणारे वॉल्टन कुटुंब या यादीत अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी ते दुसऱया स्थानावर होते. वॉल्टन कुटुंबाची एकूण संपत्ती 36.7 लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संपत्ती 14.6 लाख कोटी रुपये अधिक आहे. या यादीत यूएई आणि कतारचे राजघराणे दुसऱया आणि तिसऱया स्थानावर आहे, तर हिंदुस्थानातील अंबानी कुटुंब हे आठव्या स्थानावर आहे. हिंदुस्थानातील मिस्त्री कुटुंब 23 व्या स्थानावर आहे. या कुटुंबाकडे शापूरजी पालोनजी ग्रुप आहे. जगातील टॉप 25 श्रीमंत कुटुंबांची एकूण संपत्ती 211 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या यादीतील टॉप 25 कुटुंबांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे.
कोट्यवधींची संपत्ती
वॉल्टन (36.67 लाख कोटी), अल-नाहयान (27.50 लाख कोटी), अल-थानी (14.66 लाख कोटी), हर्मेश (14.50 लाख कोटी), कोच (12.60 लाख कोटी), अल-सऊद (11.90 लाख कोटी), मार्स (11.34 लाख कोटी), अंबानी (11.34 लाख कोटी), वेर्दाईमर (7.50 लाख कोटी), थॉमसन (7.39 लाख कोटी) अशी कोटय़वधींची संपत्ती आहे. जगभरातील या टॉप टेनमधील सर्व व्यक्ती गर्भश्रीमंत आहेत. टॉप 25 मध्ये हिंदुस्थानच्या मिस्त्री गुपचा यात समावेश आहे.
कुटुंबाचा व्यवसाय
वॉल्टन कुटुंबाचे जगभरात 10 हजार 600 स्टोअर्स आहेत. तसेच वॉलमार्टचा 46 टक्के हिस्सा त्यांच्याकडे आहे. 1950 पासून हे कुटुंब व्यवसायात आहेत. फ्रान्सचे हर्मिस कुटुंबाकडे लक्झरी फॅशन कंपनी आहे. मार्स फॅमिली 1902 पासून व्यवसाय करतात. अंबानी कुटुंबात धीरूभाई अंबानी यांनी 1955 साली रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना केली. मुकेश अंबानी यांनी हा व्यवसाय पुढे नेला आहे.