अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे. तेथे 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत अपेक्षित आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निवडणुकीत कोणाला आघाडी मिळणार याबाबतची उत्कंठा वाढीस लागली आहे. निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी झोकून दिले. त्यामुळे निवडणुकीतीली चुरस आणखी वाढली आहे.
आम्ही जिंकणारच, आमच्या विजयाने अमेरिकेच्या राजकारणात नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास कमला हॅरीस यांनी व्यक्त केला. अमेरिकेतच नाही जर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला व्हार्ट हाऊसमध्ये पाठवावे, असे आवाहन ट्रम्प यांनी केले. तसेच कमला हॅरीस यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. कमला हॅरीस डाव्या विचारसरणीच्या आणि कट्टरतावादी असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
मोदी आमचे चांगले मित्र; अमेरिकेतील हिंदूंचे संरक्षण करू! – डोनाल्ड ट्रम्प
अमेरकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 270 हा बहुमताचा आकडा आहे. या निवडणुकीत मिशीगन, पॅसिल्वेनिया,जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिना महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही उमेदवार प्रचारावर जोर देत आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरीस आघाडीवर असून त्यांना 226 तर ट्रम्प यांना 219 मते मिळण्याचा अंदाज आहे.
मात्र, सात प्रांत निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात. तिथे मतदारांचे एकगठ्ठा मतदान होत नाही. तिथे अनेक मुद्द्यांवर मतदान होते. त्यामुळे निवडणुकीसाठी यांनी स्विंग स्टेट म्हणतात. त्यावर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असते. आता निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाल्याने कोणाला राष्ट्राध्यक्षपद मिळणार याची उत्कंठा वाढली आहे.