Khel Ratna Award 2025 – डी. गुकेश, मनू भाकरसह चार खेळाडूंना खेलरत्न, 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर

बुद्धिबळाच्या पटावर अव्वल ठरलेल्या डोम्माराजू गुकेशला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच बरोबर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदक पटकावत इतिहास रचणाऱ्या मनू भाकरचेही नाव खेलरत्न पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आले आहे. यांच्या व्यतिरिक्त टीम इंडियाचा स्टार हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरा अ‍ॅथलीट प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

क्रीडा मंत्रालयाने 2 डिसेंबर 2025 रोजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्याच बरोबर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 32 खेळाडूंना अर्जून पुरस्काराने सम्नानित करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाध्ये सन्मानित करण्यात येईल. क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

अर्जुन पुरस्कार विजेत्या 32 खेळाडूंची नाव

ऍथलिट्स
1) ज्योती याराजी
2) अन्नू राणी

बॉक्सिंग
3) नीतू
4) स्वीटी

बुद्धिबळ

5) वंतिका अग्रवाल

हॉकी

6) सलीमा टेटे
7) अभिषेक
8) संजय
9) जरमनप्रीत सिंग
10) सुखजीत सिंग

पॅरा ऍथलिट्स

11) प्रीती पाल
12) जीवनजी दीप्ती
13) अजित सिंग
14) सचिन सर्जेराव खिलारी
15) धरमबीर
16) प्रणव सुरमा
17) एच होकातो सेमा
18) सिमरन जी
19) नवदीप

पॅरा बॅडमिंटन

20) नितीश कुमार
21) तुलसीमाथी मुरुगेसन
22) नित्या श्री सुमती सिवन
23) रामदास

पॅरा ज्युडो

24) कपिल परमार

पॅरा नेमबाजी

25) मोना अग्रवाल
26) रुबिना फ्रान्सिस

नेमबाजी

27) स्वप्नील सुरेश कुसळे
28) सरबज्योत सिंग

स्क्वॉश

29) अभय सिंग

कुस्ती

30) अमन

पॅरा नेमबाजी

31) राकेश कुमार

स्विमिंग

32) साजन प्रकाश