Grandmaster Gukesh: विश्वविजेत्या गुकेशनं विश्वनाथन आनंद यांच्या पोस्टवर दिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला

हिंदुस्थानचा बुद्धिबळपटू गुकेश डोम्माराजूने (Gukesh D) वयाच्या 18 वर्षी जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. अशी कामगिरी करतानाच गुकेशने माजी जगज्जेता बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदच्या (Viswanathan Anand) विक्रमालाही मागे टाकत कॅण्डिडेट अजिंक्यपदापाठोपाठ जागतिक स्पर्धा जिंकली. 13 व्या फेरीअखेर बरोबरीत असलेल्या गुकेश जगज्जेत्या डिंग लिरेनचा पराभव करत 7.5 गुणांसह आपल्या पहिल्या जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली. विश्वनाथन आनंदने 25 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली होती. तर गुकेशने अठराव्या वर्षीच हे अठराव्या फिडेचे जगज्जेतेपद काबीज केले.

गुकेशच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. विश्वनाथन आनंद यांनी देखील X हँडलवरून गुकेशचं कौतुक केलं आहे.

हा क्षण बुद्धिबळासाठी अभिमानाचा आहे. हिंदुस्थानसाठी अभिमानाचा आहे. 18 व्या वर्षीच जगज्जेतेपद पटकावणे एक मोठा पराक्रम आहे. या विजयामुळे महत्त्वाकांक्षी खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असं विश्वनाथन आनंद यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

Congratulations! It’s a proud moment for chess, a proud moment for India, a proud moment for WACA, and for me, a very personal moment of pride. Ding played a very exciting match and showed the champion he is.@FIDE_chess @WacaChess pic.twitter.com/o3hq26JFPf
— Viswanathan Anand (@vishy64theking) December 12, 2024

विश्वनाथन आनंद यांच्या या पोस्टवर गुकेशनं काहीवेळापूर्वीच प्रतिक्रिया दिली आहे. गुकेशनं इतक्या कमी वयात विश्वविक्रमी कामगिरी करतानाही आपली नम्रता कायम ठेवल्याचं पाहायला मिळतं. त्यानं अत्यंत नम्रतेनं शुभेच्छांचा स्वीकार केला आहे. विश्वनाथन आनंद यांच्या पोस्टवर त्यानं Thanks Sir🙏 म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गुकेशच्या या नम्र स्वभावाचं देखील कौतुक होत आहे.

Thanks sir😊🙏
— Gukesh D (@DGukesh) December 13, 2024

chess grandmaster gukesh d