
हिंदुस्थानात गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी 70 तास किंवा 90 तास काम करावे, यावर चर्चा रंगली आहे. परंतु वीबा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यात केवळ 40 तास काम करा, असे आदेश दिले आहेत. वीबा एक सॉस बनवणारी पंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विराज बहल यांनी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत कामाचे तास केवळ 40 तास केले आहेत. कर्मचाऱ्यांकडून जास्त तासांचे काम करून घेणे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. जर तुम्ही कर्मचाऱ्यांकडून जास्त काम करून घेत असाल तर त्या बदल्यात कर्मचाऱयांना जास्त पगार द्यायला हवा, असेही ते म्हणाले. केवळ मेहनत करण्याऐवजी योग्य काम करण्यावर पह्कस करायला हवा. कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्यावर लक्ष पेंद्रीत करायला हवे, असेही ते म्हणाले. दरम्यान, इन्पहसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी गेल्या वर्षी एक विधान केले होते. तरुणांनी आठवडय़ात किमान 70 तास काम करावे, असे म्हटले होते. त्यानंतर एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनी त्यापुढे जात आठवड्यात कमीत कमी 90 तास काम करायला हवे, असे विधान केले होते.