![neehar - 2025-02-13T162749.717](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-2025-02-13T162749.717-696x447.jpg)
उन्हाळ्यात बेलाचा रस पिणे हे खूप फायदेशीर आहे. तुम्ही उन्हाळ्यात बेल फळाचा रस प्यायला तर तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. चांगली प्रतिकारशक्ती शरीराला रोगांशी लढण्यास सक्षम करते. प्रथिने, बीटा-कॅरोटीन, थायामिन, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी सारखी पोषक तत्वे बेल फळाच्या रसात आढळतात. बेल फळात ए, बी आणि सी ही पोषक तत्वे फार मोठ्या प्रमाणावर आढळतात. बेल फळापासून मुरंबा तसेच सरबतही बनवता येतो.
बेलाचा रस रक्त शुद्धीसाठी देखील खूप फायदेशीर आहे. रक्तशुद्धी साठी अनेक प्रकारची औषधे देखील उपलब्ध आहेत, परंतु बेलाचा रस हा एक नैसर्गिक पर्याय आहे, जो तुम्ही अवलंबू शकता. याशिवाय बेलाच्या रसात तूप मिसळून काही प्रमाणात सेवन केल्यास त्याचा फायदा दिसून येतो. यामुळे हृदयाचे आजार दूर राहतात. म्हणजेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. या रसाचे सेवन महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. स्तनाच्या कर्करोगा पासून संरक्षण करते. यासोबतच स्तनपान करणाऱ्या महिलांसाठीही बेलाचा रस उपयुक्त आहे, त्याच्या सेवनाने आईचे दुध वाढते.