
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी आज त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची पक्षाच्या समन्वयक पदासह सर्व पदांवरून हकालपट्टी केली. मायावती यांनी पक्षाची एक महत्त्वाची बैठक घेतली आणि हयात असेपर्यंत माझा कोणीही उत्तराधिकारी नसेल असे स्पष्ट केले. मायावती यांनी त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून आकाश यांचे नाव जाहीर केले होते. मात्र आता आकाश यांना त्यांच्या सर्व पदांवरून हटवण्यात आले आहे.
आकाश यांना पदावरून काढून मायावती यांनी त्यांचे भाऊ आनंद कुमार आणि राज्यसभा खासदार रामजी गौतम यांची राष्ट्रीय समन्वयक पदावर नेमणूक केली आहे. यापूर्वी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्याकडील पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या होत्या.