
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि युवतींचा दरवर्षी परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळातर्फे माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाही मंडळाचे संस्थापक आनंद गांवकर व संचालक सुधीर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, 16 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूल येथे युवती आणि महिलांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उर्मिला पांचाळ, श्वेता जामदार, मयूरी परब, सुवर्णा गुराम, नीलाक्षी चेंदवणकर व विद्या राबडीया यांनी केले आहे. पुरस्कारासाठी इच्छुक युवती व महिलांनी अर्जामध्ये नाव, पह्टो, पत्ता, ई-मेल, मोबाईल नंबर, कार्य करीत असलेले क्षेत्र, वैशिष्टय़पूर्ण कामगिरी, एकूण वर्षे, मिळालेल्या शाबासकीबद्दलची प्रमाणपत्रे आणि शिफारस पत्रे जोडून आपला अर्ज 8 मार्चपर्यंत दाखल करावा. संपर्क – 9819301959 / 9619188989.