
जागतिक महिला दिनानिमित्त वरळीतील जांबोरी मैदानावर शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे यांनी आयोजित केलेल्या ‘पैठणीचा खेळ रंगे… दादूसच्या संगे’ या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्या महिलांना त्यांची मनपसंत पैठणी मिळाल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दरम्यान, दादूसने सादर केलेल्या गीतांवर महिलांनी ठेका धरत महिला दिनाचा आनंद साजरा केला.
जागतिक महिला दिनानिमित्त जांबोरी मैदानावर सुमारे पाच हजार महिलांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती तर विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या 18 भाग्यवान महिलांना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘पैठणी साड्या’ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित पोलीस भगिनींना पैठणी देऊन त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते- खासदार अरविंद सावंत, उपनेते आमदार सचिन अहिर, ठाण्याच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे, अश्विनी पवार, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस निशिकांत शिंदे, वरळी विधानसभेतील अनुपमा परब, छाया कोळी, राम साळगावकर, हरीश वरळीकर, विनिता चव्हाण, ज्योती दळवी, आकर्षिका पाटील, अभिजित पाटील, शाखाप्रमुख जीवबा केसरकर, गोपाळ खाडे, रामकृष्ण शिंदे, दीपक बागवे, सूर्यकांत कोळी, शाखा संघटिका शारदा पापण, अनिता नायर, प्रज्ञा आरोलकर, संस्कृती सावंत, सुजाता सावंत, संगीता जगताप उपस्थित होत्या.